Rajura : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजुरा पोलिसांनी एका ठिकाणी अवैधरित्या साठवणूक करून ठेवलेल्या डिझेल साठ्यावर धडक कारवाई केली आहेत.या कारवाईत मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा,एक बोलेरो कॅम्पर वाहन व इतर मुद्देमाल जप्त करून दोन जणांना ताब्यात घेण्यात आला आहे.इतर फरार असल्याचे कळते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सास्ती येथील कॅम्प नं.17,येथे बोलेरो कॅम्परचा फरार चालक व इतर 2 ते 3 साथीदार कोणतीही परवानगी न घेता निष्काळजीपणे, अवैधरित्या डिझेल साठवून ठेवत असल्याचे कारवाई दरम्यान प्रथमदर्शनी पोलिसांच्या निदर्शनात आले.सदर प्रकार जीवाला धोका निर्माण करणारा असून घटनास्थळी पंचनामा करून 1020 लिटर डिझेल व साठवणुकीसाठी वापरलेली बोलेरो क्र.MH/34/BZ/8665 तसेच प्लास्टिक ड्रम,कॅन,असा जवळपास 9 लाख,91 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.सदर प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,राजुरा उपविपोअ. सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात,ठाणेदार सुमित परतेकी यांच्या नेतृत्त्वात,गुन्हे शोध पथक इन्चार्ज पोउपनि. दीपक ठाकरे,पोउपनि.पराग उल्लेवार,सफौ.किशोर तुमराम,पोहवा.पुंडलिक परचाके,विक्की निर्वाण,महेश बोलगोडवार,मिलींद जांभळे,शफीक शेख,यांनी केली केली आहेत.अशाच पद्धतीने गडचांदूर-भोयगाव मार्गावरील नाममात्र असलेल्या काही टायरच्या दुकानात सर्रासपणे डिझेल साठवून ठेवत असल्याचे चित्र आहे.राजुरा पोलिसांनी आपल्या हद्दीत कारवाई केली.आता गडचांदूर पोलीस आपल्या हद्दीत केव्हा कारवाई करणार? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.
#Chandrapur District Crime news. #Rajura police make a big splash.Illegal diesel stock worth Lakha Seized,Valuables worth Rs 9.91 lakh including Bolero Camper Seized.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
