Nagar Parishad Gadchandur : भाजप नगरसेवकांचा विषयी समिती निवडणुकीवर बहिष्कार!|Marathi News.

News@Gadchandur NP Subject Committee Election.. 

         Gadchandur : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच मोठ्या थाटामाटात पार पडली.यामध्ये नगराध्यक्ष म्हणून निलेश ताजणे निवडून आले.कॉंग्रेस सोबत युती करून त्यांनी सत्ता स्थापन केली.यानंतर उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली.यामध्ये कॉंग्रेसचे संजय मेंढी उपाध्यक्षपदी विराजमान झाले.आज 20 जानेवारी रोजी गडचांदूर नगरपरिषदेच्या विविध विषय समितीची निवडणूक होती.सकाळी 10 वाजता सभेला सुरुवात झाल्यानंतर पिटासीन अधिकारी,मुख्याधिकारी यांनी सदर समितीत किती सदस्य असावेत यावर सविस्तर चर्चा करून मतदान घेतले.यामध्ये विरोधी पक्ष भाजपच्या नगरसेवांनी समितीत 5 सदस्य असावेत असे मतदान केले तर सत्ताधारी पक्षाने समितीत 4 सदस्य असावेत असे मतदान केले.याचा ठराव मांडण्यात आला,आणि तो मंजूर करून घेण्यात आला.त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलत 4 च्या ऐवजी 5 सदस्य समितीत करावे,असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला परंतु,हा निर्णय मान्य नाही,असे म्हणत भाजपच्या स्विकृत सदस्यासह 8 ही नगरसेवकांनी सभागृह सोडले.जोपर्यंत याविषयावर ठराव पुर्ण करणार नाही तोपर्यंत सभागृहात जाणार नाही,अशी भूमिका घेत भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहाच्या बाहेर येऊन पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले.'मुख्याधिकारी हाय हाय, नगराध्यक्ष हाय हाय' अशाप्रकारे घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.यापुर्वी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या नगरसेवकांना दूजाभाव देण्यात आला होता.त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी चुक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली होती.मात्र,पुन्हा आज असे घडले. अशी चुक मुख्याधिकारी यांनी करू नये अशी अपेक्षा भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे.बातमी लिहिस्तोवर भाजपचे सर्व नगरसेवक सभागृह बाहेर बसले होते.सदर प्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला.मात्र,काही कारणास्तव संपर्क झाला नाही.

#Gadchandur NP Sabhapati Election.

             -&&&&&&&&&&&&&&&&&&&&&-