Gadchandur NP Election : गडचांदुरात 'शहर विकास आघाडी-कॉंग्रेस' युतीची सत्ता! Marathi News.

News@N.P.Election..

         Gadchandur : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली.यामध्ये 'गडचांदूर शहर विकास आघाडी'चे निलेश ताजणे शहराध्यक्षपदी निवडूनआले. 13 जानेवारी रोजी उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये कॉंग्रेसचे संजय मेंढी उपाध्यक्षपदी  विराजमान झाले.याचबरोबर कॉंग्रेसचे सचिन भोयर तर भाजपचे सतिश उपलेंचवार यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.असे असताना सध्या गडचांदूर शहर अनेक समस्यांनी ग्रस्त आहे.याठिकाणी इतर समस्यांपेक्षा सर्वात मोठी समस्या म्हणजे,स्थानिक माणिकगड (अल्ट्राटेक)सिमेंट कंपनीकडून सतत होणारा डस्ट प्रदुषण व कचऱ्याची दुर्गंधी,हे मुद्दे ऐरणीवर असून नवनियुक्त अध्यक्षांनी निवडणुकी दरम्यान जनतेला अनेक आश्वासने दिली होती.विकासाचे व्हिजन(Vision)तयार असल्याचे म्हटले होते.आता जनतेच्या या जिवघेण्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी अध्यक्षस्थानी व्हिजनचा पेटारा उघडून सदर समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर पाऊले उचलावीत,अशी आशा जनतेतून व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष निवडणूकी नंतर डस्ट प्रदुषण व कचरा दुर्गंधी संदर्भात अस्तित्वात आलेली 'गडचांदूर प्रदूषण त्रस्त संघर्ष समिती'च्या वतीने नगरध्यक्ष आणि न.प.मुख्याधिकारी,यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. 

                            'नेमकं काय आहे निवेदनात'

        गेल्या काही वर्षांपासून स्थानिक कंपनीमध्ये एफ.आर. अंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या (बायो वेस्ट)डंपिंग यार्डमुळे गडचांदुरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.चिमुकल्यांपासून वयोवृद्धांपर्यंत, सर्वांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले असून फुफ्फुसाचे कॅन्सर,त्वचा रोग,दमा,हृदयविकाराचे झटके,सर्दी,खोकला, कमी वयात केस पांढरे होणे,केस गळती,अशा एकना अनेक प्रकारच्या आजाराने येथील नागरिक त्रस्त झालेले आहे.दुर्गंधीमुळे सुखाने जेवण सुद्धा करता येत नाही. हगवण,उलट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकुणच या सिमेंट कंपनीचे डस्ट वायू प्रदुषण व कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील जनतेला जीवन जगणे अक्षरशः कठीण होऊन बसले आहे.या सर्व बाबींना एकमेव माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार असल्याचे आरोप करत ही समस्या मार्गी लागावी म्हणून,नगराध्यक्ष व समस्त नगरसेवक आणि न.प.मुख्याधिकारी,यांना समितीतर्फे निवेदन देण्यात आले आहेत.

      सदर सिमेंट कंपनीविरुद्ध जनतेचा रोषा पाहता आपण आपल्या अधिकाराचा वापर करून सदर कंपनी विरोधात तात्काळ ठराव घेऊन,एफ.आर.डम्पिंग यार्ड कायमचे बंद करावे,डस्ट वायू प्रदूषणावर कायदेशीर कारवाई करून याचा कायमचा बंदोबस्त करावा.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.असे न झाल्यास मोठा जनआंदोलन उभारण्याचा इशारा गडचांदूर प्रदुषण त्रस्त संघर्ष समिती तर्फे देण्यात आला आहे.निवेदन देताना सुरेश कांबळे, धनंजय छाजेड,हंसराज चौधरी,पवन देरकर,नितीन उपगंलावार,डॉ.कुलभूषण मोरे,प्रशांत गोखरे,नागेश चटप मनोज भोजेकर इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आता नगराध्यक्ष महोदय जनतेची ही समस्या किती दिवसात कायमस्वरूपी मार्गी लावतात? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

#Gadchandur N.P.Election...

                  &&&&&&&&&&&&&&&&&&&&&