Chandrapur : "चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेसला मिळालेले अभूतपूर्व यश म्हणजे ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती'च्या लढाईत सर्वसामान्य जनतेने दिलेला ऐतिहासिक कौल आहे.अहंकाराचा पराभव करून चंद्रपूरच्या स्वाभिमानी मतदारांनी लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे.हा विजय माझा एकटीचा नसून प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आणि शहराच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तमाम माझ्या चंद्रपूरकरांचा आहे,” असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.शहराचा विकास केवळ कागदावर किंवा जाहिरातीत न राहता तो प्रत्यक्षात जमिनीवर दिसावा,ही जनतेची आर्त हाक आम्ही ऐकली आहे.निवडून आलेले काँग्रेसचे सर्व शिलेदार पूर्ण ताकदीनिशी जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शक, लोकाभिमुख आणि सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा असेल,याची ग्वाही त्यांनी या विजयाच्या निमित्ताने दिली. चंद्रपूर शहराला भ्रष्टाचारमुक्त आणि स्वच्छ प्रशासन देणे, हेच मुख्य ध्येय असून विकासाच्या नावाखाली होणारी लूट थांबवून मूलभूत सोयी,सुविधांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल.या महाविजयासाठी काँग्रेस पक्ष एकसंघ म्हणून लढला.यामध्ये काँग्रेसचे विधानसभा गटनेते आ. विजय वडेट्टीवार,आ.सुधाकर अगबाले,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.सुभाष धोटे,ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय,महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर आणि चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे,यांचे विशेष योगदान व मार्गदर्शन लाभले आहे.आगामी काळात आम्ही सर्वजण मिळून स्वच्छ,सुंदर आणि सुसंस्कृत चंद्रपूर घडविण्यासाठी वचनबद्ध आहोत,असा निर्धारही खासदार धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
'पून्हा एकदा काँग्रेसची जादू.'
काँग्रेस नेते,विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर,चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या एकसंघ प्रचार रणनीती,परिश्रम आणि नागरिकांच्या काँग्रेसवरील भक्कम विश्वासामुळेच हे शक्य झाले.कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला. "आगामी काळात चंद्रपूर जिल्हात काँग्रेस याच पद्धतीने जनसेवेच्या कामात हिरिरीने सहभागी राहून चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तथा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील,असा विश्वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केला." चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीत यश प्राप्त करून कॉंग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.तसेच या निवडणुकीत UBT ने भरारी घेतल्याचे दिसून आले तर BJP बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहेत!
#Chandrapur Municipal Corporation Election.#MP Pratibha Dhanorkar.#X-MLA Subhash Dhote.#MLA Vijay Wadettiwar.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
