Gadchandur : येथील निष्पाप नागरीक हल्ली येथील माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डस्ट प्रदुषण आणि घनकचऱ्याच्या जीवघेण्या दुर्गंधीमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत.यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.ही परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून कायम असून संबंधितांना कित्येकदा निवेदन दिले,मोर्चे काढले, कंपनी प्रशासनावर काहिच परिणाम झाला नाही.काही दिवस शांतता दिसते,नंतर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर आता नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणारे 'निलेश ताजणे' यांनी या दिर्घकालीन समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.गडचांदुरकरांचे आरोग्य व तक्रारी लक्षात घेऊन त्यांनी गेल्या 3 जानेवरी रोजी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली.या बैठकीत नगर परिषदेतील सर्वपक्षीय नगरसेवक, सिमेंट कंपनीचे अधिकारी,पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.घनकचरा दुर्गंधी नियंत्रणासाठी Bio-Enzyme Spray चा वापर,कचरा प्रक्रिया (Processing),दुर्गंधी व आरोग्य विषयक समस्या, कचरा वाहतुकी दरम्यान होणारा त्रास,अशा समस्यांंवर सविस्तर चर्चेनंतर एका आठवड्याच्या आत परिसर दुर्गंधीमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.उपाययोजना पूर्ण होईपर्यंत सिमेंट कंपनीचा घनकचरा प्रकल्प,डम्पिंग यार्ड प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.मात्र,या बैठकी विषयी कोरपना तालुका मनसे तालुकाध्यक्ष 'सुरेश कांबळे' यांनी अशाप्रकारे टीकात्मक मत व्यक्त केले आहेत.
'नेमकं काय म्हणाले कांबळे'
गडचांदूर शहरामध्ये माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कडून होणाऱ्या वायु प्रदुषण....!ही जी दुर्गंधी पसरविण्याचे काम घनकचरा व्यवस्थापनच्या माध्यमातून सुरू आहे. याला शासन प्रशासनाने परवानगी दिल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत असल्याचे कळते.परंतू,यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.ही सिमेंट कंपनी गडचांदुरकरांच्या जीवावर उठली असून गडचांदूरचे नवनियुक्त नगराध्यक्ष निलेश ताजने,यांनी काल परवा माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रशासनासोबत एक बैठक घेतल्याची माहिती आहे.पण,मला असा वाटते की, येड्याची समज फड्याने काढण्याचा हा प्रकार आहे. जोपर्यंत Bio-Enzyme Spray करणे वाढवणार नाही, तोपर्यंत याला स्थगिती देण्यात आली आहे.स्थगिती म्हणजे काय?एखादा नवीन प्रस्ताव जर आला असेल आणि त्याला जर विरोध होता असेल तर त्या प्रस्तावाला स्थगिती देतो, असे आपण म्हणतो.पण पुर्वी वर्ष दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे.याच्या स्थगितीचा प्रश्नच येत नाही.माणिकगड प्रशासनाला बोलावून त्यांनी जे काम केले,म्हणजे 'तू मारल्यासारखे कर,मी रडल्यासारखे करतो' हे स्पष्ट दिसते. डस्ट प्रदुषण,वायु प्रदुषणाविषयी माणिकगड सिमेंट कंपनी विरुद्ध मनसेचे पुर्वीपासुनच आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत ही समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत मनसे वारंवार आंदोलन करत राहील.ते म्हणते स्थगिती दिली,पण मला वाटत नाही,कारण आम्ही जेव्हा शहरात फेरफटका मारतो तेव्हा ते कचऱ्याच्या गाड्या शहरा बाहर उभे दिसतात. रात्रीच्या वेळी त्यांची वाहतूक चालू होते.कंपनीमध्ये गाड्या इन होतात आउट होतात,कचरा पडत राहतो,काम चालू राहतो,या पद्धतीचा काम येथे सुरू आहे.'चोराच्या उलट्या बोंबा' या पद्धतीचा काम सुरू असल्याचे टीकात्मक मत कांबळे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहेत.
#Manikgarh Cement Works Gadchandur.
#Solid Waste Project in Manikgarh Cement.
$$$$$$$$$$$$$$$$$$$
