Smuggling of cattle : गोवंशीय जनावरांची तस्करी!|Marathi News.

News@Crime...

   Chandrapur : जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलिसांनी कारवाई करत 29 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.ही जनावरे कत्तलीसाठी घेवून जाणार होते.सदर प्रकरणी एकाला अटक करण्यात आली तर इतर फरार झाले आहेत.पोंभुर्णा पोलिसांना 31 जानेवारी रोजी गुप्त माहिती मिळाली की,काही इसमांनी पोलीस स्टेशन हद्दीतील चक ठाणे शेतशिवारात गोवंश जनावरे(बैल)कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने बांधून ठेवले आहे.अशा माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकला असता 29 नग गोवंशीय जनावरे,चारापाण्याची कोणतीही सोय न करता दिर्घकाळ उपाशी अवस्थेत निर्दयतेने बांधून ठेवलेले दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी 29 जनावरे किंमत अंदाजे 6 लाख,81 हजारांचा मुद्देमाल जप्त करून उमाजी बक्काजी कालीवार वयवर्ष 49 रा.पोंभुर्णा व ईतर फरार आरोपी वाहन चालक रा.बेंबाळ,यांच्या विरुद्ध संबधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.जनावरांना प्यार फाउंडेशन चंद्रपुर,येथे पाठवण्यात आले आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPOसत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि.राहुल ठेंगणे,सफौ.वासुदेव आत्राम,पोहवा.हरीन्द्रकुमार भारती, पोअं.जगदिश पिपरे,पोअं.अतुल मोरे,चालक पोअं. रजनिकांत,यांनी केली असून पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहे.

#Chandrapur District Crime News Apdate.#Smuggling of cattle.

                          $$$$$$$$$$$$$$$$$$