LCB Takes Strong Actiion : घरफोडी करणाऱ्या दोघांना बेड्या!| Marathi News.

News@Crime...

        Chandrapur : जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा(LCB)चे पथक चंद्रपूर शहरात प्रोव्हीशन जुगार रेड,मोटार सायकल चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना चेक करणे कामी पेट्रोलिंगवर असतांना गुप्त माहिती मिळाली की,आरोपी मोहम्मद सरफरोज सगीर शहा,यांनी पोस्टे रामननगर हद्दीतील इंदिरा नगर परिसरात घरफोडी केलेली आहे. सदर माहितीवरून आरोपीचा शोध घेवून मोहम्मद सरफरोज सगीर शहा वयवर्ष 25 रा.आमटे ले-आऊट रयतवारी कॉलरी चंद्रपूर,सद्दाम मुस्ताक शेख वयवर्ष 30 रा.घुग्घुस,याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता,त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर,क्रिष्णानगर,शामनगर परिसरात 3 ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितल्याने त्यांच्याकडून 21 लाख 19 हजार रुपयांचा माल जप्त करून घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणले आहे.पुढील तपासासाठी आरोपींना रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीकक्ष ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात,LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांच्या नेतृवात पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि.सुनिल गौरकार,पोहवा.सुभाष गोहोकार,पोहवा. सतिश अधथरे,पोहवा.रजनिकांत पुठ्ठावार,पोहवा.दिपक डोंगरे, पोहवा.इम्रान खान,मपोहव.विजयमाला वाघघमारे,मपोहवा. निराशा तितरे,पोअं.हिरालाल गुप्ता,पोअं.किशोर वाकाटे,पोअं. शशांक बदाणवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर तसेच पोअं. अनिमेश भोंगडे,पोहवा.भिरू यादव,पोस्टे.सायबर येथील अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.#LCB takes Strong Actiion.

                               $$$$$$$$$$$$$$$$$$$