LCB action against illegal liquor transportation : अवैधरित्या दारू वाहतुकीवर LCB ची धडक कारवाई!| Marathi News.

News@Crime...

              Chandrapur : जिल्ह्यातील सावली पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या देशी-विदेशी दारूच्या 54 पेट्या बाळगून त्याची विक्री व वाहतूक करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB)च्या पथकाने कारवाई करून 15 लाख,94 हजार 970 रुपयांचा माल जप्त केला आहे.सदर कारवाई 7 फेब्रुवारी रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून व्याहाड बुद्रक येथील महेश गड्डमवर,हा त्याच्या परिणीती ट्रान्सपोर्ट एक्वा चिल्ड वॉटर नावाचे ऑफिस व गोडाऊन,येथून एका लाल रंगाच्या क्रेटा कारमध्ये देशी, विदेशी दारूची विक्रीसाठी वाहतूक करणार आहे.

             दरम्यान सदर कार,ऑफिस व गोडाऊनची पंचासमक्ष LCB पथकाने पाहणी केली असता 3 हजार 800 नग,प्रत्येकी 90 ml च्या देशी दारूच्या बाटल्या किं.अं.1 लाख,52 हजार,384 नग रॉयल स्ट्रॉंग विदेशी कंपनीच्या 180 ml च्या बाटल्या(मध्यप्रदेश) की.अं.99 हजार,840 रू.,96 रॉयल स्ट्रॉंग विदेशी कंपनीच्या 180 ml च्या बाटल्या(महाराष्ट्र)कीं.अं.24 हजार,144 हवाड्स 5000 कंपनीच्या 500 ml च्या कैना कीं.अं.18 हजार,720 रु.,दुकानाच्या ड्राफ्टमध्ये असलेले 2 लाख,95 हजार,410 रू.रोख,कॅमेरा डीव्हीआर की किं.अं.5 हजार,एक लाल रंगाची हुंडाई क्रेटा कार क्र.MH/40/AR/2365 किं.अं.10 लाख,असा एकूण 15 लाख, 94 हजार,970 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर व पाहिजे असलेल्या आरोपीविरुद्ध सावली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे उपविपोअ.सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB चंद्रपूरच्या पथकाने केली असून पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.

#Chandrapur District Crime News.#LCB action against illegal liquor transportation.

                           $$$$$$$$$$$$$$$$$$$$