Ganja Selling Case : गांजा विक्री करणारे 2 जणांना बेड्या!|Marathi News.

News@Crime...

       Chandrapur : जिल्ह्यातील भद्रावती पोलीसांना 8 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोस्टे. हद्दीत मानोरा फाटा येथे नाकाबंदी करून खबरेप्रमाणे एक होंडा शाईन मोटार सायकल क्र.MH/40/CN/3966,याला थांबवून हर्षल राजेंद्र रक्षीत वयवर्ष 24 रा.काटोल पंचशील नगर नागपूर व दुसरा अंशुमन रविंद्र विर वयवर्ष 24 रा.येनवा ता.काटोल नागपूर,यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा सदृश्य वनस्पती(अमली पदार्थ)एकूण 3 किलो, 116 ग्रॅम किं.अं.62 हजार,302 रुपयाचा माल अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे मिळुन आले.यावरून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील गांजा,मोटार सायकल आणि दोन मोबाईल,असा एकूण 1 लाख,62 हजार,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,वरोरा उपविपोअ.संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात सपोनि.संजय मिश्रा,सपोनि.मोहन धोंगडे,पोउपनि. संतोष केदार,गुन्हे शोध पथकातील पोउपनि.गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर,पोहवा.गोपाल आतकुलवार,पोअं.जगदिश झाडे, धर्मराज मुंडे,संतोष राठोड,खुशाल कावळे,योगेश घाटोडे,कोमल मोहजे यांनी केली आहे.

#Chandrapur District Crime News.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$