Chandrapur : जिल्ह्यातील पाथरी पोलीस स्टेशन येथे 8 फेब्रुवारी रोजी तकार प्राप्त झाली की,मौजा चक विरखल गावच्या टि पॉईंटवरील सचिन आनंदराव गंदाटे वयवर्ष 33 रा.विरखल यांचे हार्डवेअर व कृषी केंद्र दुकानाच्या दरवाज्याला लावलेला कुलूप व दरवाज्यासमोरील CCTV कॅमेरा तोडून अज्ञात आरोपीने दुकानाचे काउंटर मधील नगदी 91 हजार रू.व 2 लहान हातोडे चोरून नेले आहेत.त्यावरून पाथरी पोलीस स्टेशन,येथे अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आली.
सदरच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा पाथरी पोलीस कसोशीने शोध घेत असतांना गुप्त माहितीवरून सदरच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश बंडू भोयर वयवर्ष 26 वर्ष व त्याचा अल्पवयीन मित्र दोन्ही रा.निमगाव,यातील आरोपी भोयर याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्याला अटक केली.त्यांनी सदरच्या गुन्ह्यातील चोरलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम स्वतः व अल्पवयीन मित्राने खर्च केली.उर्वरीत रक्कम 74 हजार व 2 लहान हातोडे घरी लपवून ठेवल्याचे सांगितले,तेव्हा ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले. अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकास पालकाचे ताब्यात देण्यात आले व अटक आरोपीस न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,मुलचे SDPO सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि. नितेश डोर्लीकर,पोउपनि.गोविंद चाटे,पो.स्टाफ पोहवा.खेलेश कोरे,पोअं.अमीत मस्के,पोअं.मेघश्याम गायकवाड,पोअं.गिरीधर आंबोरकर,पोअं.बळीराम बारेकर, चालक पोअं.प्रविण कोवे बन यांनी केली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.
#Chandrapur District Crime.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
