Chandrapur : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन नागभिड हद्दीत गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती 3o जानेवारी रोजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा (LCB)च्या पथकाला मिळाली.त्या माहितीच्या आधारे छापा टाकून ट्रक क्र.CG/24/S/7667 मधील 30 नग गोवंश जनावरे (गाय,बैल,गोरे)ताब्यात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने लाखनी जि.भंडारा,येथील गोशाळा येथे दाखल करण्यात आले आहे.दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे.Illegal Transportation of Cattle .
प्रदीप बाळकृष्ण वाटघुरे वयवर्ष 33 रा.देवरी जि.गोंदीया, रिजवान अहमद अब्दुल रऊफ कुरेशी वयवर्ष 28 रा.दारव्हा जि.यवतमाळ व पाहिजे असलेले मोहम्मद जमील कुरेशी रा.नागपूर,मोहम्मद साकिब खान रा.मूर्तिजापूर जि.अकोला अशी आरोपींची नावे असून एक ट्रक,दोन मोबाईल फोन आणि 30 नग गोवंश जनावरे,असा एकूण 32 लाख,60 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये नागभिड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात LCB पथक व उपविभाग ब्रम्हपुरी पथकाने केली आहेत.
#Chandrapur District Crime News.#Transportation of cattle.#Chandrapur Local Crime Branch Takes Strong Action.
$$$$$$$$$$
