Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाला 5 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेगांव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा भिवकुंड,येथे नाकाबंदी करून एक पिकअप वाहन क्र.MH/49/BZ/1769,ला थांबवून तपासणी केली असता,त्यामध्ये 6 नग गोवंशीय जनावरांची(बैल)कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करून नेत असतांना मिळून आल्याने वाहन चालक महेश सुर्यभान लोंढे वयवर्ष 38 रा.गोरेवाडा नागपूर व राहूल अरुण वानखेडे वयवर्ष 23 रा.हिंगणा,यांच्या ताब्यातून 6 जनावरे किं.अं.1 लाख,50 हजार आणि चारचाकी वाहन किं.अं.5 लाख,70 हजार,असा एकूण 7 लाख,20 हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपी व पाहिजे असलेला आरोपी सचिन वैद्य रा.कोंढा ता.नागभीड जि.चंद्रपूर,यांच्या विरुद्ध शेगांव पोलीस स्टेशन,येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास शेगांव पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सफौ.धनराज करकाडे,पोहवा.नितीन साळवे,नितीन कुरेकार,प्रमोद कोटनाके,पोअं.अमोल सावे,चापोहवा. गजानन मडावी यांनी केली आहे.
#Chandrapur District Crime News.
#LCB Action Against Illegal Transportation of Cattle.
$$$$$$$$$$$$$$$$$$$
