Lathi Sports Championship : राष्ट्रीय लाठी स्पर्धेत 'या' शाळेच्या 'हार्दिक बेतावार'ला सुवर्णपदक!| Marathi News.

News@Championship...

       Gadchandur : ट्रॅडिशनल लाठी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मध्यप्रदेशातील उज्जैन,येथील इनडोअर स्टेडियम येथे,28 व 29 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय लाठी स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती.यामध्ये गडचांदूर येथील 'आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल'च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहेत.हार्दिक बेतावार,प्रियंका राज,प्रित्युष सिंग, आदर्श कांबळे,यांना सुवर्णपदक तर रणवीर पवार,सर्वेश राऊत,ज्ञानेश्वर पिदुरकर,यांना रोप्य पदक व गौरी खडसे हिने कास्यपदक पटकाविले आहे.

   मुख्याध्यापक डॉ.मोहन,यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक सिंधू कुशवाह,यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल व्यवस्थापनतर्फे सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय त्यांचे आई-वडील,मुख्याध्यापक,क्रिडा शिक्षक,शिक्षकवृंद व शालेय व्यवस्थापनाला दिले आहेत. हार्दिक बेतावार हे नगरसेवक सतीश बेतावार,यांचे पुतणे असून त्यांनी आपल्या सुवर्ण पदकाचे श्रेय मोठे वडील सतीश बेतावार,यांना सुद्धा दिले आहेत.

#Lathi Sports Championship...

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$$