Jagtik Dhamma Dhwaj Din : जागतिक धम्म ध्वज दिन साजरा!| Marathi News.

News@Jagtik Dhamma Dhwaj Din...

Gadchandur : येथे आज 8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिनानिमित्य धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भदंत ज्ञानज्योती महाथेरो संघरामगिरी व भदंत डॉ. धम्मचेती महाथेरो संघरामगिरी यांच्या धम्मदेसनेचा कार्यक्रम पार पडला व त्यानंतर महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विदर्भाचा बुलंद आवाज संभाजी ढगे व यशवंत गायकवाड यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. त्याठिकाणी भीमसेना बहुउदेशीय सुधार संस्था गडचांदूर, यांच्या माध्यमातून आयोजित विविध कार्यक्रमात कोरपना राजुरा व जिवती तालुक्यातील बौद्ध उपासक,उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

       अजय साखरे,नितेश रंगारी व प्रकाश चुनारकर,यांच्या वतीने भोजनदान ठेवण्यात आले होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक तथा संस्थेचे अध्यक्ष राहुल उमरे,सचिव विक्की मुन,शैलेश चांदेकर,देवानंद मुन शाकेष उमरे,प्रकाश मुन,कोवन कातकर,गौरव पथाडे मीनाल मुन,संघर्ष रामटेके,महेश ससाणे,अंकुर गावंडे, अमित थोरात,प्रकाश ताडे,प्रकाश डोंगरे,मुकेश रामटेके यांनी मोलाचे सहकार्य केले.

#Jagtik Dhamma Dhwaj Din...

                   &&&&&&&&&&&&&&&&&&&&