Gadchandur : येथे 26 जानेवारी रोजी शहर भाजपच्या वतीने 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भाजपचे व्यापारी आघाडी अध्यक्ष 'विश्वंभर झाम' यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गडचांदूर भाजपच्या सर्व आघाडीतील महिला-पुरुष पदाधिकारी,भाजपचे नवनियुक्त नगरसेवक,जेष्ठ, तरूण नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. येथील नगरपरिषद,पोलीस स्टेशन,विविध शासकीय निमशासकीय कार्यालय,शाळा महाविद्यालय येथे आदरपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले.आजच्या दिवशी अख्खे गडचांदूर शहर अक्षरशः तिरंगामय झाल्याचे पाहायला मिळाले.एकुणच हा दिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
#Happy Republic Day 2026.
$$$$$$$$$$$$$$$$
