Chandrapur : जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा पिरली,येथे एका ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगार खेळणाऱ्यांविरोधात भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.24 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 4 जणांना ताब्यात घेतले.दरम्यान पोलिसांना पाहून जवळपास 7 जण फरार झाले आहेत.घनश्याम शेषराव उत्ताने वयवर्ष 50 रा. मांगली,दिपक नथ्थूजी बोथले वयवर्ष 33 रा.वाघेडा, मारोती उर्फ नंदकिशोर महादेव झाडे वयवर्ष 42 रा.पिरली व हनुमान ज्ञानेश्वर देठे वयवर्ष 35 रा.पिरली (सर्व रा.ता. भद्रावती),अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून अंगझडतीत मिळालेले 3 हजार 160 रू.डावावरील 1 हजार 250,विविध कंपन्यांच्या 6 दुचाकी किं.अं.4 लाख 25 हजार,52 ताश पत्ते किं.अं.100,असा एकूण 4 लाख, 29 हजार,510 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यातील आणि फरार आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर, पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,वरोरा उपविपोअ. संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोस्टे.चे पोनि. योगेश्वर पारधी यांच्या नेतुत्वात गुन्हे शोध पथकातील पोउपनि.गजानन तुपकर,सफौ.महेन्द्र बेसरकर,पोहवा. अनुप आस्टुनकर,जगदीश झाडे,विश्वनाथ चुदरी,गोपाल आतकूलवार,पोअं.खुशाल कावळे,योगेश घाटोळे,संतोष राठोड, यांनी केली आहे.
#Gambling Raid. #Chandrapur District Crime News Update.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$
