Chandrapur District Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक!|Marathi News.

News@Crime...

    Chandrapur : जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्टेशन येथे 4 जानेवारी 2026 रोजी श्रीमती उशा प्रभाकर उताने वयवर्ष 50 रा.तनस कॉलनी ठक्कर वार्ड चिमुर,यांनी तक्रार दिली की,नेहरु शाळा चिमुर येथे त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने वयवर्ष 31,याला कोणीतरी मारझोड केल्यामुळे तो जखमी होऊन मृत अवस्थेत पडलेला आहे.अशा तक्रारी वरून संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू करण्यात आली.

       घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी चौकशी केली असता, आकाशने दारूच्या नशेत आरोपींना शिवीगाळ केल्याने यांच्यात झटापट झाली.यातुनच आरोपींनी आकाशचा खुन केल्याचे समजले.त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविपोअ.दिनकर ठोसरे,पोनि.दिनेश लबडे,यांच्या मार्गदर्शनात आरोपीचे शोध घेणे कामी सपोनि.ताळीकोटे, पोउपनि.देरकर,पोहवा.सचिन साठे,पोहवा.प्रमोद पढाल, पोहवा.प्रमोद पिसे,पोहवा.डोनू मोहुर्ले,पोअं.सचिन खामनकर,पोअं.रोहित तुमसरे,पोअं.फाल्गुन परचाके,पोअं. रुपेश शामकुळे,पोअं.विकास बारसागडे,पोअं.गणेश वाघ, पोअं.सोनू येलकुचेवार,यांना रवाना करून सदर पथकाने गुन्ह्यातील अरोपी नामे सुजल विलास सोनवाने वयवर्ष 20 रा.नेताजी वार्ड चिमुर,छगण मोहन दिगोरे वयवर्ष 27 रा. नेताजी वार्ड चिमुर,अनिकेत शेषराव साखरकर वयवर्ष 24 रा.नेताजी वार्ड चिमुर,यांचा अवघ्या तिन तासात शोध घेऊन अटक केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. दिनेश लबडे,यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Chandrapur District Crime News.

                       $$$$$$$$$$$$$$$$$$$$$