Admirable work : भटक्या कुत्र्यांना जीवनदान देऊन सामाजिक बांधिलकीचे जतन!|Marathi News.

News@Apuliki Foundation...

                  Rajura : येथील 'आपुलकी फॉउंडेशन'च्या मुख्य संयोजिका कृतिका सोनटक्के आणि त्यांची संपुर्ण टीम, सामाजिक बांधिलकी म्हणून भटक्या कुत्र्यांची निस्वार्थपणे सेवा करीत आहे.गेल्या पाच वर्षांपासून जवळपास पाचशेच्या वर भटक्या कुत्र्यांना यांच्यामुळे जीवनदान मिळाले असून फॉउंडेशनच्या अध्यक्षा कृतिका सोनटक्के, उपाध्यक्षा रमा आईटलावार,सचिव कविता कुमार, सहसचिव भावना रागीट,कोषाध्यक्ष सुनीता जमदाडे, संचालक रश्मी साहु,शुभम सरकार,मनीष बोरकर,बळवंत ठाकरे,किरीट बोलम,रक्षा शर्मा आणि नियमित मोफत सेवा देणारे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.सुचिता धांडे, पशूधन विकास अधिकारी डॉ.नरसिंग तेलंगे,डॉ.सचिन धारकरी यांच्या सहकार्यातून राजुरा शहरातील शेकडो कुत्रे, मांजर,गाईंना जीवनदान मिळाले आहे.मुक्या जनावरांना सुद्धा भावना असते,त्यांना प्रेमाची गरज असून त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.त्यांच्यावर अन्याय करणे, विनाकारण दुखापत करणे,त्यांच्या विषयीची क्रूरता देवालाही मान्य नाही.असे असताना आपुलकी फॉउंडेशनच्या या निस्वार्थ कार्याला आमचा सलाम.अशी भावना काही पशुप्रेमींनी व्यक्त केली आहे.#Apuliki Foundation Rajura.#Admirable work.#issue of Stray dogs.

                         $$$$$$$$$$$$$$$$$$$$