Gadchandur : कर्कश आवाजामुळे नागरिक,विद्यार्थी,वृद्ध व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो.बुलेटमध्ये वेगवेगळ्या सायलेन्सर मॉडीफाय करून रहदारीच्या ठिकाणी बुलेट राजा मुद्दामून बुलेटचा आवाज करत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास होतो.ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम,यांच्या नेतृत्वात 27 डिसेंबर रोजी शहरातील विविध भागात विशेष मोहीम राबवून नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरच्या सात बुलेट स्वारावर वाहतूक अंमलदार पोहवा.सुरेश बल्की,पोअं.श्रिनीवास सोडणर पोअं.पराग राजुरकर यांनी संबंधीत कलमान्वये कारवाई केली आहे.
गडचांदूर पोलीसांच्या या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पोलीसांचे आभार व्यक्त केले आहे.सदर कारवाईमुळे शहरातील शांतता अबाधित राहण्यास मदत होणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
'दुचाकीस्वारांना इशारा.'
कर्कश आवाजाच्या सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकी स्वारांवर महाराष्ट्र आणि देशभरातील पोलीस कठोर कारवाई करत आहेत,ज्यात दंड ठोठावणे,परवाने निलंबित करणे आणि सायलेन्सर जप्त करून ते तोडणे (रोड रोलर खाली देणे)यासारख्या कारवाईंचा समावेश आहे.ही कारवाई ध्वनिप्रदूषण कमी करणे,शांतता राखणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे या उद्देशाने केली जाते,कारण असे आवाज हृदयविकार आणि तणाव वाढवतात.कारवाईची मालिका सुरू असून भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी दिला आहे.
#Silencer Sound.
#Action by Gadchandur Police.
$$$$$$$$$$$$$$$$$$$
