New Year Celebration, Gadchandur Police on Alert Mode.ठाणेदारांनी 'हे' केले आवाहन.

News@Drunk & Drive...

Gadchandur : सरत्या 2025 वर्षाला निरोप देताना आणि नवीन 2026 वर्षाचे स्वागत उत्सव साजरा करताना, अतिउत्साही तरूण मंडळी मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी,वाहने भरधाव वेगाने,बेदरकारपणे चालवतात. तसेच रोडने रॅश Rashड्रायव्हिंग,स्टंटबाजी सारखे कृत्य करतात.त्यामुळे गंभीर अपघात घडून जीवितहानी होत असते.मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक & ड्राइव्हची कारवाई सुरू असतानाच,न्यु ईअर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी गडचांदूर पोलीस अलर्ट मोडवर असून या सेलिब्रेशनला गालबोट लागू नये म्हणून कोणीही मद्य प्राशन करून वाहने चालवू नये,नववर्षाचे स्वागत करताना वाहतुक नियमांचे पालन काटेकोरपणे करावे व अपघात होणार नाही,याची दक्षता घ्यावी.        मद्य प्राशन करून वाहने चालवताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.असे आवाहन गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी केले आहे. नेहमी पोलीसांना सहकार्य करत रहा,पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असून असे काही करू नये,ज्यामुळे उत्साहाला गालबोट लागेल.पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करत समस्त जनतेला 'नवीन वर्षा'च्या शुभेच्छा ठाणेदार शिवाजी कदम यांनी दिल्या आहेत.

#New Year Celebration...

#The Thanedars Appealed 'This,'....

#New Year Celebration,Gadchandur Police on Alert Mode....

                          $$$$$$$$$$$$$$$$$$$$