Gadchandur : नववर्ष 2026 च्या पार्श्वभूमीवर “महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे”जिल्हाध्यक्ष राजेशजी सोलापन यांच्या निर्देशानुसार 28 डिसेंबर रोजी कोरपना तालुका महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक पार पडली.यामध्ये “सैय्यद मुम्ताज़ अली” यांची सर्वानुमते चौथ्यांदा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.दरम्यान सिद्धेश्वर केंद्रे आणि दिनेश झाडे,या पत्रकार बांधवांनी संघात प्रवेश केला.नवनियुक्त अध्यक्ष आणि संघात प्रवेश केलेल्या केंद्रे व झाडे,यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या बैठकीमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर लगेच तालुकाध्यक्ष अली,यांनी नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर केली.यामध्ये गणेश लोंढे व सतिश बिडकर,यांची तालुका उपाध्यक्षपदी तर अनिल गेडाम सचिव,अमोल बेरड सहसचिव,गौतमजी धोटे सल्लागार आणि संघात प्रवेश केलेल्या सिद्धेश्वर केंद्रे,दिनेश झाडे, यांची सदस्य म्हणून निवड केली.दरम्यान संघाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सोलापन यांच्यासह अनिल देठे जिल्हा उपाध्यक्ष,विनोद पन्नासे सचिव,धर्मेश निकोसे, पुरुषोत्तम चौधरी महासचिव,प्रकाश हांडे कोषाध्यक्ष, प्रभाकर आवारी,धनराज कोवे,नवजोत झाडे,विक्की गुप्ता यांच्यासह इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनियुक्तांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दील्या आहेत.
#Maharashtra Gramin Patrakar Sangh Taluka Korpana...
▪️🔸▪️🔸▪️🔸▪️🔸▪️🔸▪️🔸▪️
