Illegal Sand Transportation : रेतीच्या ट्रॅक्टरवर कारवाई,हायवा वाहनांना मोकळे रान!|Marathi News.

News@Sand Transportation...

Gadchandur : कोरपना तालुक्यात हल्ली अवैधरित्या रेती वाहतुकीने कमालीचा उच्चांक गाठला आहे.रेती घाटांचे लिलाव झाले नसताना रेती तस्करी जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.इरई-भोयगाव,मारडा व इतर तालुक्याच्या नदीपात्रातून सर्रासपणे रेतीचे उत्खनन करून तालुक्यातील गावखेड्यात विक्री केली जात आहे.महसूल विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे.परंतू,कारवाई केवळ ट्रॅक्टरवर होत असून हायवा वाहनांना मोकळे रान उपलब्ध करून दिल्याचे आरोप होत आहे.रेती माफियांना 'अच्छे दीन' आल्याचे चित्र असून महसूल विभाग हायवा वाहनांवर कारवाई का करत नसेल? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.Sand Transportation in Korpana Taluka.

लगतच्या तालुक्यातून रात्रंदिवस मोठ्याप्रमाणात खुलेआम बेदरकारपणे हायवा वाहनांद्वारे अवैधरित्या रेती वाहतूक होत असताना गेल्या आठ,दहा दिवसात केवळ मुरुम,रेती, आणि इतर भुसंपदाची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली जात आल्याचे दिसून येत आहे.मात्र,दररोज हायवाद्वारे इतर तालुक्याची रेती राजुरा मार्गे थेट कोरपना तालुक्यात आणली जाते आणि येथील काही दलालां मार्फत विविध शहर व गाव खेड्यात घरपोचता केली जाते, यांच्यावर कारवाई होत नाही.संबंधित तलाठी,पोलीस प्रशासन,मंडळ अधिकारी,यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत असून,हे हायवे नेमके कोणाचे,यांना कोणत्या नेत्याचा आशिर्वाद असेल? असे एकना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.हायवातून रेती आणताना आणि खाली करताना नागरिक उघड्या डोळ्याने पाहतात. मात्र,महसूल विभाग कर्मचाऱ्यांना हे दिसत नाही? याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात असून एकीकडे रेतीघाट बंद असताना दुसरीकडे तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी भरमसाठ रेती पडून असल्याचे दिसून येते? ही रेती आली कुठून? या मागचा सुत्रधार कोण? सर्व खेळ पडद्याआड सुरू आहे.महसूल विभाग या रेतीच्या ढिगाऱ्यांवर जप्तीची कारवाई का करत नसेल?असे प्रश्न निर्माण होत आहे.ट्रॅक्टरवर होत असलेल्या धाडसी कारवाईचे स्वागतच,परंतू इतर तालुक्यातून हायवा वाहनांद्वारे बेदरकारपणे थेट कोरपना तालुक्यात होत असलेल्या अवैधरित्या रेती वाहतुकीवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे,असे मत व्यक्त होत आहे.तहसीलदार,तलाठी, मंडळाधिकारी,पोलीस प्रशासन,या रेती माफियांच्या हायवावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#Illegal Sand Transportation in Korpana Taluka.

                          $$$$$$$$$$$$$$$$$$$$