Gadchandur : येथील नगर परिषदेचे तत्कालीन प्रभारी (CO)मुख्याधिकारी येमाजी धुमाळ,यांनी व्यंकटेश बालसनिवार यांना दारू दुकानासाठी दिलेल्या नाहरकत (NOC)चा मुद्दे आता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरच्या दालनात पोहोचला असून माजी नगरसेवक अरविंद डोहे,यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 10 नोव्हेंबर 2025 रोजी मा.न्यायालयाने सदर प्रकरण 6 आठवड्यात निकाली काढण्याचे आदेश दिले.यापुर्वी नगरसेवक डोहे यांनी संबंधितांना सदर दुकानाला दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करून तत्कालीन मुख्याधिकारी धुमाळ यांच्यावर कारवाई करावी आणि दारू दुकान बंद करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती.मात्र,कारवाई होत नसल्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले लागले.असे डोहे यांनी म्हटले आहे.
सदर दारू दुकान प्रकरणी माजी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केलेल्या पाठपुराव्या संदर्भात सविस्तर असे की, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका कोरपना येथील गडचांदूर, येथील व्यकटेश बालसनिवार यांना दारू दुकानासाठी गडचांदूर नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी येमाजी धुमाळ,यांनी नियमबाह्य,बेकायदेशीर नाहरकत प्रमाणपत्र दिले.सदरचे प्रमाणपत्र रद्द करून तत्कालिन मुख्याधिकारी धुमाळवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डोहेंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी,यांनी एक चौकशी समिती गठीत केली.मात्र,बराच कालावधी लोटुनही कुठल्याही प्रकारची चौकशी होत नसल्याने डोहे यांनी उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ नागपुरात पिटीशन दाखल केली. त्यावरून उच्च न्यायालयाने सदर प्रकरण 6 आठवड्यात निकाली काढण्याबाबतचे आदेश पारित केले.यावरून समिती अध्यक्ष,चौकशी समिती तथा बल्लारपूर नगरपरिषद मुख्याधिकारी व इतरांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले.परंतु सदरचे दुकान बंद करण्याची कारवाई अजूनही झाली नसल्याने दुकान चालूच आहे.संदर्भीय आदेशाची अंमलबजावणी करून तात्काळ विषयांकित देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे.अशी विनंती वजा मागणी माजी नगरसेवक अरविंद डोहे यांनी संबंधितांकडे केली आहे.दरम्यान गडचांदूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.यामध्ये अरविंद डोहे भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे होते.यावेळी प्रचारादरम्यान विरोधकांकडून डोहे यांच्या विषयी अपप्रचार करत बदनामी करण्यात आली की, “काही लोकं तक्रार करतात व पैसे घेऊन गप्प बसतात.” आता या आदेशाने विरोधक तोंडघशी पडले असून येणाऱ्या काळात अजुन काय काय घडामोडी घडतात,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
#Gadchandur Liquor Shop NOC Case.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
