Dust Pollution in Gadchandur City : गडचांदूर शहर डस्ट प्रदुषणाच्या विळख्यात!|Marathi News.

News@Pollution.....

             Gadchandur : चंद्रपूर जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर शहर,येथील निष्पाप शहरवासीय गेल्या कित्येक वर्षांपासून येथील माणिकगड {अल्ट्राटेक}सिमेंट कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे अक्षरशः त्रस्त आहे.या जीवघेण्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठीची मागणी घेऊन आजपर्यंत विविध प्रकारची आंदोलने झाली.मात्र, परिस्थीतीत बदल काही झालेला दिसत नाही.उलट दिवसेंदिवस डस्ट प्रदुषणात वाढ होत असून कंपनीतून होणाऱ्या सिमेंटच्या डस्ट प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.दमा,खाज,खुजली फुफ्फुस,अशा विविध प्रकारच्या रोगांमूळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.यामूळे पर्यावरणाची सुद्धा हानी होत आहे.सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले एकच काम म्हणजे,घरातील डस्ट साफ करणे यामुळे महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.या कंपनीविरुद्ध अनेकदा प्रदुषण विभागाला निवेदन दिले, आंदोलने केली.परंतू,तात्पुरते प्रदूषण कमी करून परत प्रदूषणात वाढ करण्याचे काम कंपनी प्रशासनाकडून केले जात आहे.कंपनीतून निघणार्‍या कणीयुक्त डस्टमुळे शहरातील कित्येक नागरिकांना श्वासाचे आजार जडले असून आजाराची मालिक सतत सुरू आहे.प्रदुषणातून सुटका व्हावी म्हणून त्रस्त नागरिकांनी कित्येकदा आंदोलनाचे हत्यार उपसले,कित्येकदा निवेदने घेऊन लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उंबरठे झिजवले.मात्र,नेहमी आश्वासनेच पदरी पडली, समाधान काही झालेला नाही.Dust pollution in Gadchandur city.कितीही बोंबला संबंधीत विभाग कारवाई करायला तयारच नसल्यामुळे येथील नागरिकांना अघोषित नरकयातना भोगाव्या लागत आहे.आंदोलने केली,बोंबाबोंब केली तर काही दिवस शांत वातावरण असते,पुन्हा जैसेथे परिस्थिती निर्माण होते.हल्ली दररोज मोठ्या प्रमाणात डस्ट सोडला जात असल्याने पुन्हा शहरात विशेषतः कंपनी लगतच्या साई शांतीनगर,थुटरा,ढुमने लेआऊट व परिसरात डस्ट प्रदुषण होताना दिसत आहे.असे असताना मात्र, प्रदुषणाच्या विषयावर नेते मंडळी “तेरीभी चुप,मेरीभी चुप” असल्याच्या भुमिकेत असून “खालपासून वरपर्यंत सर्व काही ओक्के” असल्याचे सनसनाटी आरोप नागरिकां कडून होत आहे.सदर सिमेंट कंपनी प्रशासन नागरिकांच्या जीवावर उठल्याचे दिसत असून डस्ट प्रदुषणापासून केव्हा सुटका होईल,अशी विचारणा केली जात आहे.संबंधीतांनी लक्ष देण्याची गरज असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.#Dust Pollution is a Big Problem...

#Dust Pollution in Gadchandur City...

                       $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$