Chandrapur : जिल्ह्यातील पडोली पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा साखरवाही आशुतोष दिलीप शेरकी वयवर्ष 21,याने 9 जानेवारी 2019 रोजी तक्रार दिली की, त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या वैभव पुंडलिक शेरकी वयवर्ष 35,याने मृतक दिलीप बाबुराव शेरकी वयवर्ष 51, याला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झगडा-भांडण करून बांबुच्या काठीने डोक्यावर,हातावर,छातीवर जबर मारहाण करत गंभीर जखमी करून जिवानिशी ठार केले.या तक्रारी वरून पडोली पोलीस स्टेशन येथे अप.क्रं.9/ 2019 कलम 302,324 भादंविचा गुन्हा गुन्हा नोंदवुन गुन्ह्याचा सखोल तपास पडोली पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोउपनि.नागेश जायले,यांनी करून तपासाअंती भक्कम पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असता,कोर्ट विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधिश चंद्रपूर श्रीमती एस.एस.भिष्म मॅडम,यांनी आज दि.29 डिसेंबर 2025 रोजी आरोपीस कलम 303 भादंवि मध्ये आजन्म सश्रम कारावास(जन्मठेप)व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर गुन्ह्यात आरोपीला शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता श्री प्रशांत घटुवार जिल्हा सरकारी वकील चंद्रपूर,आणि पैरवी अधिकारी म्हणुन मपोअं./ 2670 रोशनी रंगारी आणि दत्तक अधिकारी म्हणून सपोनि.योगेश हिवसे,यांनी कामगिरी बजावली आहे.
Chandrapur District Crime News....
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
