Chandrapur District Crime : गोवंश जनावर वाहतूकीवर कारवाई!| Marathi News.

News@Crime...

     Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा(LCB)पथकाला 26 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुल पोलीस स्टेशन हद्दीतील नांदगाव,येथे नाकाबंदी करून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका पिकअप वाहनाला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये 8 नग गोवंश जनावर(बैल)दिसून आले.सदर जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी अवैधरित्या नेत असल्याची माहिती मिळत आहेत.

      यावरून आरोपी वाहन चालक स्वप्निल प्रल्हाद कुलमेथे वयवर्ष 32 रा.येरगाव ता.पोंभुर्णा,विजय खुशाल बट्टे वयवर्ष 27 रा.घडोली ता.गोडपिपरी यांना ताब्यात घेऊन पिकअप वाहनातील 8 नग जनावरे आणि पिकअप वाहन क्रं.MH/ 34/BZ/9152,असा एकूण 6 लाख,60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जनावरे प्यार फाउंडेशन चंद्रपूर,येथे दाखल करण्यात आले आहे.आरोपींविरुद्ध मुल पोलीस स्टेशन येथे संबंधीत कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहफौ.धनराज करकाडे,पोहवा.चेतन गज्जलवार,पोहवा. सुरेंद्र महतो व चापोअं.गजानन मडावी यांनी केली आहे.

#Action by LCB Chandrapur.

                       $$$$$$$$$$$$$$$$$$$$