Firing at Rajura.राजूरा येथे गोळीबार...

News@Firing at Rajura...

Rajura : राजुरा येथे 23 जुलै रोजी रात्री अंदाजे 8 ते 8.30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहे, हीचा जागीच मृत्यू झाल.तर एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. Shot at Rajura...?

          सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा,येथील सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक दुशमनीतून मारण्यासाठी काही अज्ञात व्यक्ती राजूरा शहरात दाखल झाले होते. ही बाब लल्ली याच्या लक्षात येताच तो रात्री अंदाजे 8 च्या सुमारास भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरात शिरला.तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.नेमक्या त्याच वेळी सचिन यांच्या पत्नी सौ.पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांचा छातीत गोळी लागली आणि त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी पुर्वशा डोहे यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.घटनेच्या वेळी सचिन डोहे बाहेर गेले होते.

Bharatiya Janata Yuva Morcha District Vice President Dohe's wife died on the spot, one injured...

     🔸💠🔸💠🔸💠🔸💠🔸💠🔸💠🔸