Chandrapur : हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून विशेळ मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण 42 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. दिवाळीच्या पुर्वसंध्येला पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
हरविलेल्या मोबाईल संदर्भात ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने CEIR पोर्टलच्या माध्यमातून पोलीस ठाण्याच्या हद्दीसह आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत 42 मोबाईल मिळून आले.आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी ब्रह्मपुरी पोलिसांचे आभार मानले आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
या मोहिमेत गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे,पोलीस हवालदार मुकेश गजबे,मिलिंद नैताम,पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे,निलेश तुमसरे,इर्शाद खान,स्वप्नील पळसपगार व वशिष्ट रंगारी यांनी मोलाची भूमिका बजावली.
#Chandrapur District Police.

