Illegal liquor transportation : अवैध दारू वाहतुकीचा प्रयत्न फसला; 16.56 लाखांचा मुद्देमाल जप्त.LCB व कोठारी पोलिसांची संयुक्त कारवाई.| Marathi News.

News@Crime...

     Chandrapur : कोठारी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडला.या कारवाईत देशी दारूच्या 39 पेट्यांसह ट्रक,असा एकूण 16 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.6 व्हेंबर 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारशाह-कोठारी मार्गावरील सातबारा हॉटेलजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली.यावेळी MH-34-AB-5592 क्रमांकाच्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता,ट्रक न थांबवता पळून जाऊन काही अंतरावर ट्रक सोडून चालक फरार झाला.

पंचांसमक्ष ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या 39 पेट्या(90 एमएलच्या एकूण 3,900 बाटल्या)आढळून आल्या.दारूची किंमत 1 लाख 56 हजार रुपये तर ट्रकची किंमत 15 लाख रुपये,असा एकूण 16 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी कोठारी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग राजुरा पथक व कोठारी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.

#Illegal liquor transportation. #Chandrapur Crime News. #LCB Chandrapur. #Kothari Police.

                    ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢