Sindewahi : तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून,30 आक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळी नवरगावजवळील धुमनखेडा येथे वाघाच्या हल्ल्यात पत्रू रामाजी मेश्राम(वय 75),या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला.ते सायंकाळी 5.30 च्या सुमारास स्वत: च्या शेताकडे जात असताना गावानजीक प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकरी,वनविभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.विशेष म्हणजे,2 ते 3 दिवसांपूर्वीच भेंडाळा व पळसगाव जाट येथे वाघाच्या हल्ल्यात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
#75-year-old farmer dies in tiger attack; Sindewahi taluka shaken. #Shocking News.

