Chandrapur : भारतात 31ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.हे भारत सरकारने 2014 मध्ये सादर केले होते भारताच्या राजकीय एकात्मतेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकता दिनासाठी चंद्रपूर येथील 50 नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ गुजरातकडे रवाना झाले असून 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकता परेड सोहळ्यात केंद्र शासनाचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहेत.शांतता,विकास आणि सुरक्षिततेच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर बहुमान मिळाला आहे.देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गुजरात राज्यातील एकता नगर (केवडीया),येथील 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' परिसरात 31 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय एकता परेड सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक, विद्यार्थी,उद्योजक अशा विविध क्षेत्रातील 50 नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ रवाना झाले आहे.
देशाची एकात्मता,सार्वभौमत्व आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासीक राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने पुर्वी नक्षल प्रभावित राहीलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर,गडचिरोली आणि गोंदीया या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष अतिथी म्हणुन निमंत्रीत केले आहे.या उपक्रमांर्तगत चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व संवेदनशील भागातील 50 नागरिकांचा समावेश असलेले हे विशेष शिष्टमंडळ गुजरात दौऱ्यावर जात आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या समन्वयातून निशीकांत रामटेके,पोलीस निरीक्षक,जिल्हा विशेष शाखा चंद्रपूर व पथक,यांनी प्रतिनिधी मंडळाच्या गुजरात येथील,या अभ्यास व प्रेरणा दौऱ्याचे काटेकोर नियोजन केले. प्रतिनिधी मंडळातील पहिल्या टप्यात 26 ऑक्टोबर 2026 रोजी सपोनि.मंगेश भोंगळे,नियंत्रण कक्ष,चंद्रपूर यांच्यासोबत 3 नागरिकांना तसेच 29 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस निरीक्षक, दारासिंग राजपूत,पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर,यांच्यासोबत 33 नागरिकांना आणि 30 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस उप निरीक्षक,मनोजकुमार नाले,पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर,यांच्या सोबत 14 नागरिकांना एकता नगर,गुजरात येथे रवाना करण्यात आले आहे.विविध क्षेत्रातील एकूण 50 नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळासोबत चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याची एक विशेष समन्वय पथक तैनात करण्यात आले असून नागरिकांच्या प्रवास,निवास व सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे.
चंदपूर जिल्ह्यातुन रवाना करण्यात आलेले 50 नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ 31ऑक्टोबरच्या मुख्या सोहळ्यापुर्वी सरदार सरोवर प्रकल्प,एकात्मका संकुल आणि गुजरात परिसरातील विविधी विकास प्रकल्पांना भेट देणार आहे.
'शांततेकडून समृध्दीकडे वाटचाल' :
एकेकाळी नक्षल हालचालींमुळे विकासापासून दूर राहिलेल्या भागातील नागरिकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे,राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे आणि देशाची भव्यता अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन देणे,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.चंद्रपूरच्या प्रतिनिधींचा हा सहभाग जिल्ह्याच्या शांतता,सुरक्षितता आणि सर्वागीन विकासाच्या प्रवासाला नवा आयाम देणारा ठरेल,असा विश्वास जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
#National Unity Day Celebration #Chandrapur #Statue of Unity.

