Freedom from addiction : क्रिकेटच्या मैदानातून व्यसनमुक्तीचा संदेश; गडचांदूर पोलिसांचा व्यसनमुक्तीसाठी पुढाकार!|Marathi News.

News@freedom from addiction...

Gadchandur : अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि तरुणांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचांदूर येथील विदर्भ कॉलेजच्या पटांगणावर ३० ऑक्टोबर रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विशेष पोलीस महानिरीक्षक,नागपूर परिक्षेत्र आणि जिल्हा पोलीस अधीक्षक,चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स,महाराष्ट्र राज्य यांच्या दि.२० ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने गडचांदूर पोलीस स्टेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत पोलीस स्टेशन पाटण संघाने विजेतेपद पटकावले,तर गडचांदूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या हस्ते पार पडला.यावेळी ठाणेदार प्रमोद बानबले यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम विशद केले. तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी,असे आवाहनही त्यांनी केले.या स्पर्धेला गडचांदूर परिसरातील युवा क्रिकेटपटूंसह २०० हून अधिक क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती दर्शविली.क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा गडचांदूर पोलिसांचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.

#A message of freedom from addiction. #Gadchandur police.

                       ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢