Inspirational Story : बीडमधील अंबाजोगाईत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक दरम्यान ‘अमृत दौड’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन स्पर्धेत स्वयंपाकाचे काम करणाऱ्या रमाबाई रणवीर(वय ४७)यांनी आपल्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी साडी नेसून,अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक मिळवत ३ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.त्यांच्या या कामगिरीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.मॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी कोणतेही महागडे स्पोर्ट्स शूज किंवा कसलेही धावण्याचे प्रशिक्षण नसताना केवळ अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर समाबाईंनी स्पर्धेत सहभाग घेत ती जिंकली.रमाबाईंची ही कहाणी अनेक तरुण पिढीला प्रेरणा देणारी आहे.
एक-एक स्पर्धकांना मागे टाकत मिळवला पहिला क्रमांक :
सुरुवातीला स्पर्धेतील तरुण-तरुणी वेगाने पुढे निघून गेले.काही अंतर पार केल्यानंतर पायातील स्लीपर निसटू लागल्याने रमाबाईंनी ती हातात घेतली आणि अनवाणी पायाने धावायला सुरुवात केली आणि एक-एक स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला.रमाबाईंनी ही स्पर्धा जिंकल्यावर त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षिस म्हणून 3 हजार रुपये देण्यात आले.
दरम्यान,पतीच्या निधनानंतर पदरात असलेल्या दोन्ही मुलींना शिकवून मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी रमाबाईंवर आहे. मुलींच्या शिक्षणासाठी त्या मूळ गाव हिंगोली सोडून अंबाजोगाईत वास्तव्यास आल्या.येथे त्या स्वयंपाकाचे काम करतात.मात्र,या स्पर्धेत विजय मिळवत त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल.मात्र,मागे हटणार नाही,असा संदेश समाबाईंनी दिला.
#Inspirational Story. #Mother Run in Marathon Beed. #Ramabai Ranveer.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
