Grand Raksha Bandhan; Gadchandur : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त गडचांदूर येथे भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार,६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता स्व.भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा,गडचांदूर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव (दादा)भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शहरातील सर्व मातृशक्ती तसेच महिला भगिनींना या कार्यक्रमासाठी आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांनी सोबत एक राखी आणून देवरावदादांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्याव्यात,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे,कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्यात येणार आहे.
भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे हे नाते अधिक दृढ करणाऱ्या या रक्षाबंधन सोहळ्यात लाडक्या देवरावदादांना राखी बांधण्यासाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
#Grand Raksha Bandhan celebration in Gadchandur.#𝐌𝐋𝐀 𝐃𝐞𝐨𝐫𝐚𝐨 𝐁𝐡𝐨𝐧𝐠𝐥𝐞.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
