Gadchandur police's 'action plan' on the occasion of Ganesh chaturthi : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचांदुर पोलिसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ |Marathi News.

News@Gadchandur Police...

       Gadchandur : आगामी गणेशोत्सव व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडचांदूर पोलीस ठाण्यात सोमवारी(दि.७ सप्टेंबर) विविध विभाग व घटकांची संयुक्त बैठक घेण्यात आली.उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

बैठकीला गडचांदूर उपविभागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक व मालक,पोलीस पाटील,पोलीस मित्र,शांतता समितीचे सदस्य,बांधकाम विभाग,महावितरण विभाग तसेच नगरपरिषद प्रतिनिधींची उपस्थिती होती.

बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी गणेश मंडळांना गणेश स्थापना ते विसर्जनापर्यंत घ्यावयाची काळजी व आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.डीजे चालक व मालकांना ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत तसेच २ टॉप आणि २ बेस संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

विसर्जन मार्गावरील विद्युत तारांची योग्य उंची राखणे,आवश्यक ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे याबाबत महावितरण विभागाला सूचना देण्यात आल्या.तसेच विसर्जन मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या.

गडचांदूर नगरपरिषदेलाही विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणे तसेच मार्गातील अडथळा ठरणारी झाडे कापण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.पोलीस पाटील यांना सण-उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठकीला नागरिक व संबंधित प्रतिनिधी,गडचांदूर उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दरम्यान,गणेश मंडळे तसेच डीजे चालक-मालकांना कलम १६८ बी.एन.एस.अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या.आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये,यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

#Gadchandur Police.#Gadchandur police's 'action plan' on the occasion of Ganesh chaturthi.

                             ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢