Chandrapur : रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स तसेच कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण व सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे साऊंड सिस्टीम आणि उच्च क्षमतेचे प्लाझ्मा साहित्य असा एकूण ₹१२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केले जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.यावेळी एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य बसवून शासकीय नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ऑपरेटर व वाहन चालकाकडे डीजे,साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा वाजविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची अधिकृत परवानगी आहे का, याबाबत विचारणा केली.मात्र,त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
न्यायालयाचे आदेश तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच डीजे व प्लाझ्मा साहित्य जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
₹१२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त.
पोलिसांनी केलेली कारवाई :
१) ट्रॅक्टर व ट्रॉली — अंदाजे किंमत ₹७,००,०००
डीजे व प्लाझ्मा साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर व ट्रॉली.
२) डीजे साऊंड सिस्टीम व उच्च क्षमतेचे प्लाझ्मा साहित्य — अंदाजे किंमत ₹५,५०,०००
एकूण जप्त मुद्देमाल — ₹१२,५०,०००
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकूरके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली आहे.
विनापरवाना डीजे चालकांना पोलिसांचा इशारा :
सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या,विहित मर्यादेपेक्षा अधिक कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम अथवा प्लाझ्मा वाजविणाऱ्या तसेच विनापरवाना डीजेचे संचालन करणाऱ्यां विरुद्ध यापुढेही चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
#Dj Dolby Case #Action by Chandrapur Police.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
