Crime News: घरासमोरून बुलेट चोरीला; राजुरा पोलिसांच्या डी.बी. पथकाची वर्धा जिल्ह्यात धडक कारवाई,आरोपी अटकेत!| Marathi News.

News@Bike thief...

Chandrapur : राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाळा येथून चोरीस गेलेल्या रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकलचा छडा लावण्यात राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला(डी.बी.पथक) यश आले आहे.पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून आरोपीला अटक करून चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकल जप्त केली आहे.

     फिर्यादी‌ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांच्या चुनाळा येथील राहत्या घरासमोर उभी केलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अप.क्र.७१३/२०२६,कलम ३०३(२)भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोनि.नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि.लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तलोडी (कुटकी)ता. सेलू,जि.वर्धा येथे छापा टाकून संशयित आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

अटक आरोपी :

अनुराग प्रवीण धाबर्डे (वय २१)व्यवसाय मजुरी रा.तलोडी(कुटकी) ता.सेलू,जि.वर्धा.

जप्त मुद्देमाल :

काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल क्रमांक MH-34-AX-1120 — अंदाजे किंमत ₹१ लाख.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत (उपविभाग राजुरा),यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

कारवाईत पोनि.नितीन चिंचोळकर,गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सपोनि.लक्ष्मण लोकरे,सफौ.किशोर तुमराम,पोहवा.विक्की निर्वाण,पोहवा.अनुप डांगे,पोअं.शफीक शेख,मिलिंद जांभुळे, महेश बोलगोडवार,रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी सहभाग घेतला.

#Chandrapur District Crime News #Rajura Police Action Against Bike thief.

                     ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢