Chandrapur Crime News : ‘कालसर्प दोष’ निवारणाच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार; तिघे पोलिसांच्या ताब्यात.|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : गृहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या पूजेचे ढोंग रचून एका २७ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाणे हद्दीत घडल्याची माहिती आहे.पीडित महिलेच्या तक्रारीवरून भीसी पोलिसांनी मुख्य संशयितासह त्याच्या 2 साथीदारांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे शुभम लटारी खंगार (वय २६,रा.मसाडा ता. वरोरा),सचिन परमेश्वर मोडक (वय २८,रा.चिखल वानोजा ता.वरोरा)आणि तेजस गुंडेराव वालकटे (वय २४,रा.उमरेड,जि. नागपूर),अशी आहेत.

पतीच्या प्रकृतीसाठी केली होती महाराजाशी संपर्क :

 पोलिसांत दाखल तक्रारीनुसार,तक्रारदार विवाहितेच्या पतीची प्रकृती सातत्याने अस्वस्थ राहत असल्याने कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी तसेच कालसर्प दोष निवारणासाठी कुटुंबीयांनी जगन्नाथ महाराज भद्रभेष देवस्थानचा तथाकथित महाराज शुभम खंगार याच्याशी संपर्क साधला होता.त्यानुसार रविवार ३० ऑगस्ट रोजी शुभम खंगार हा सचिन मोडक आणि तेजस वालकटे या दोघांसह पीडितेच्या घरी पूजा करण्यासाठी आला.

पूजेच्या विधीदरम्यान पतीला घराबाहेर पाठवले :

पूजा सुरू असताना आरोपीकडून कपाळावर बोट ठेवणे,लिंबू ओवाळणे आदी विधी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरतीचे ताट,लिंबू आणि बोरीचे काटे आणण्याच्या बहाण्याने पीडितेच्या पतीला घराबाहेर पाठवण्यात आले.पती घराबाहेर गेल्यानंतर सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांनी बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून पतीला आत येण्यास रोखल्याचा आरोप आहे.

पतीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा आरोप :

त्यानंतर शुभम खंगार याने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून पीडितेला तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तिन्ही संशयितांना पकडले :

घटनेनंतर पीडितेने बाहेर येत पती आणि नातेवाईकांना आपल्या सोबत घडलेला प्रकार सांगितला.यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळावरून तिन्ही संशयितांना पकडून थेट भिसी पोलीस ठाण्यात नेले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

भिसी पोलिसांकडून गुन्हा दाखल :

पीडित महिलेच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी तिन्ही संशयितां विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१),३५१(३)आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर मुळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

#Chandrapur District Crime News. #Dhongi Maharaj Case.

                            ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢