Chandrapur Crime : “दुचाकी चोर LCBच्या जाळ्यात; ५ गुन्ह्यांचा छडा,₹२.३० लाखांचा मुद्देमाल जप्त!”| Marathi News.

News@Crime...

     Chandrapur : स्थानिक गुन्हे शाखा (LCB),चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत रेकॉर्डवरील संशयित दुचाकी चोर प्रतिक धनराज झाडे (वय ३३,रा.महाकाली वॉर्ड, चंद्रपूर),यास ताब्यात घेतले.आरोपीच्या ताब्यात आढळून आलेली TVS कंपनीची मोटारसायकल चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले.आरोपीच्या सखोल चौकशीतून पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरीच्या आणखी दुचाकी हस्तगत केल्या.

आरोपीच्या ताब्यातून मिळालेली TVS मोटारसायकल क्र.MH-34-BU-5217 ही पोलीस स्टेशन पडोली येथील अपराध क्र. २९१/२०२६,कलम ३०३(२)भारतीय न्याय संहितेअंतर्गत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर आरोपीची सखोल चौकशी केली असता,त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुध डेअरी कॉलनी,चंद्रपूर येथील झाडी-जंगल परिसरासह इतर ठिकाणांहून चार दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.

हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकी :

१. TVS मोटारसायकल क्र.MH-34-BU-5217

किंमत : ₹४०,०००/-

पोलीस स्टेशन पडोली,अपराध क्र.२९१/२०२६

२. होंडा ॲक्टिव्हा मोपेड क्र.MH-34-CA-4413

किंमत : ₹५०,०००/-

पोलीस स्टेशन रामनगर,अपराध क्र. ७३९/२०२६

३. होंडा ॲक्टिव्हा मोपेड क्र.MH-31-FL-7928

किंमत : ₹८०,०००/-

पोलीस स्टेशन बर्डी, जि.नागपूर,अपराध क्र.५०६/२०२६

४. हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र.MH-34-AG-6839

किंमत : ₹६०,०००/-

दरम्यान,आरोपीने पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील अपराध क्र. ८४३/२०२६ मधील चोरीची पॅशन प्रो मोटारसायकल माणिकगड, राजुरा परिसरात बेवारस अवस्थेत सोडल्याचे तपासात समोर आले आहे.सदर मोटारसायकल पोलिसांनी यापूर्वीच जप्त केली आहे.

या कारवाईत एकूण चार दुचाकी, अंदाजे ₹२ लाख ३० हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,आरोपीच्या माध्यमातून दुचाकी चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुढील कारवाई :

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी त्यास पोलीस स्टेशन पडोली,जि.चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग चंद्रपूर पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

#Chandrapur District Crime News #LCB Chandrapur. 

                           ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢