Chandrapur Crime : नवीन बांधकामाच्या घरातून साहित्य चोरी; LCB च्या तपासात आरोपी जेरबंद, २८ हजारांचा मुद्देमाल जप्त.|Marathi News.

News@Crime...

  Chandrapur : शहरातील छत्रपतीनगर,तुकूम परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातून इलेक्ट्रिक साहित्य,मशिनरी व बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरीला गेल्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)उकल केली आहे.या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून,त्याच्याकडून सुमारे २८ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास छत्रपतीनगर, तुकूम,चंद्रपूर येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातून अज्ञात चोरट्याने विविध इलेक्ट्रिक साहित्य,कटर मशीन,ग्राइंडर मशीन तसेच बांधकामासाठी उपयोगी साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप.क्र.१०६०/२०२६ कलम ३०५ भारतीय न्याय संहिता (BNS)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना ससुर उर्फ कोलकाता साहजन मंडल (वय ३९,रा.फुटनगर,चंद्रपूर मूळ रा.पश्चिम बंगाल)याच्याबाबत माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे LCB पथकाने त्यास ताब्यात घेत चौकशी केली.चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडून चोरीचा सुमारे २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल :

जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये विविध कंपन्यांच्या ड्रिल मशीन,कटर मशीन,टायटन मशीन,रोटर मशीन,ग्राइंडर मशीन, दरवाज्याचे कब्जे तसेच इतर बांधकामासाठी उपयुक्त साहित्याचा समावेश आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई तसेच गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला रामनगर पोलीस ठाणे,चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का,याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

LCB पथकाची कामगिरी :

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत सपोनि.योगेश हिवसे,पोउपनि.विनोद भुरले,पोउपनि. सुनील गौरकार,पोहवा.सतीश अवथरे,लागू यादव,इमरान खान, हिरालाल गुप्ता,संदीप कांबडी,पोअं.शशांक बदामवार,किशोर वाकाटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.तसेच सायबर सेल,चंद्रपूर येथील पोहवा.कार्तिक खनके, पोअं.गुणवंत व अनिमेश यांनी तपासात सहकार्य केले.

#Crime News. #Chandrapur District Crime. #Action by LCB Chandrapur.

                        ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢