Chandrapur Crime : घरफोडीचा LCB ने लावला छडा; वर्ध्यातून दोघे ताब्यात,₹2.93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!|Marathi News.

News@Crime...

Chandrapur : सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम,आसा जवळपास ₹२ लाख 93 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे.CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला.

दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीस गेली.याबबत सिंदेवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.त्यावरून अप.क्र.५४७/ २०२६,कलम ३३१(४),३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील CCTV फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपींची माहिती मिळवली.त्यानंतर पथकाने सावंगी मेघे येथून सुनील शांताराम शिंदे (वय २४),रा.बोरगाव टेकडी,सावंगी मेघे,जि.वर्धा आणि सुजल युवराज कुमरे (वय१९), रा.बोरगाव टेकडी,सावंगी मेघे,जि.वर्धा यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे मंगळसूत्र,सोन्याचे मणी, चांदीचे कडे,चांदीच्या पायपट्ट्या व गोप इतर दागिने,रोख रक्कम असा अंदाजे ₹२ लाख ९३ हजार ३२७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस ठाणे येथे सुरू आहे.

कारवाई पथक :

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग वरोरा तसेच ब्रह्मपुरी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूरच्या पथकाने ही कारवाई केली.

#Chandrapur District Crime #Action by LCB Chandrapur.

                            ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢