Ballarpur : ओडिशातून चारचाकी वाहनाने गांजाची तस्करी करून विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)सापळा रचून अटक केली.ही कारवाई २ सप्टेंबर २०२६ रोजी बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी चौकात करण्यात आली.या कारवाईत १७.४७५ किलो गांजा, चार मोबाईल आणि चारचाकी वाहन असा एकूण १७ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,काही इसम ओडिशातून गांजा घेऊन चारचाकी वाहनाने येत असून,तो विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत.या माहितीची खात्री करून LCB पथकाने बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी चौकात सापळा रचला.
संशयित चारचाकी वाहन क्रमांक HH-24-BR-9282 तेथे येताच पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.यावेळी वाहनामध्ये गांजा सदृश्य वनस्पती एकूण १७.४७५ किलो आढळून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अमोल रमेश कांबळे(वय ३३, रा.एरंडी सरोडा,ता.औसा,जि.लातूर),सदानंद रविंद्र जना (वय ३२,रा.साबोरीया,ता.खलीगोट,जि.गंनजम, ओडिशा)आणि ओंगा बिरा कोवासी (वय २८,रा.बोपनपल्ली,ता.कालीमेला,जि. मलकनगिरी,ओडिशा),यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून १७.४७५ किलो गांजा, चार मोबाईल आणि चारचाकी वाहन असा एकूण १७,०८,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act)अंतर्गत बल्लारशा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,तिघांनाही अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारशा पोलीस ठाणे करीत आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत सपोनि.दिपक कांकेडवार,सपोनि.बलराम झाडोकार, पोउपनि.सर्वेश बेलसरे,सफौ.स्वामीदास चालेकर,पोहवा.अजय बागेसर,गणेश भोयर,रामराव बिंगेवाड,शरद कुडे,रजनीकांत पुठ्ठावार,सचिन गुरनुले,सुभाष गोहोकार,पोअं.प्रतिक हेमके,विठ्ठल काकडे,प्रफुल पुप्पलवार आणि पोशी.दिनेश अराडे यांनी सहभाग घेतला.
#Chandrspur Crime News. #Action by LCB Chandrapur.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
