Chandpur Crime :चोरीची पल्सर घेऊन फिरत होता; LCBने 18 वर्षीय तरुणाला घेतले ताब्यात.| Marathi News.

News@Crime....

        Chandpur : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB)चंद्रपूर पथकाने शहरात पेट्रोलिंगदरम्यान कारवाई करत चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली.शासकीय दूध डेअरी,चंद्रपूर परिसरातून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून अंदाजे 70 हजार रुपये किमतीची बजाज पल्सर NS-125 मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

दि.8 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असताना शासकीय दूध डेअरी परिसरात संशयित हालचाली आढळून आल्या.पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता,चोरीच्या मोटारसायकल बाबत माहिती समोर आली.त्यानंतर मोटारसायकल जप्त करण्यात आली.या कारवाईत शुभम बिरन जाधव (वय 18 वर्षे, रा.इंदिरानगर,चंद्रपूर),यास ताब्यात घेण्यात आले आहे.

उघडकीस आलेला गुन्हा :

पोलीस स्टेशन मूल अप.क्र.637/2026,कलम 303(2)BNS.

जप्त मुद्देमाल :

बजाज पल्सर NS/125,मोटारसायकल क्र.MH/26/CT/ 0760,अंदाजे किंमत 70 हजार रुपये.या प्रकरणातील प्रवीण विश्वकर्मा,रा.लखमापूर,चंद्रपूर हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग वरोरा पथकाने केली.

#Chandrapu District Crime News. #Action by LCB Chandrapur.

                           ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢