Gadchandur : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गडचांदूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव(दादा)भोंगळे यांनी स्वतः बाईक चालवत रॅलीचे नेतृत्व केले.त्यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.Tiranga Bike Rally.
सकाळी जवळपास ११ वाजताच्या सुमारास स्थानिक संविधान चौकातून या रॅलीला सुरुवात झाली.शेकडो देशभक्त नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत रॅलीची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता करण्यात आली.
यावेळी भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने बाईकवर तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. महिलांनी फेटे परिधान करून लावलेली उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले. Independence Day 2026.
‘तिरंगा हा स्वाभिमान,त्याग आणि एकतेचे प्रतीक’ - आ.भोंगळे.
रॅलीच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आ. देवराव भोंगळे म्हणाले की,तिरंगा हा केवळ देशाचा ध्वज नसून तो भारताच्या स्वाभिमान,त्याग आणि एकतेचे प्रतीक आहे.स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली असून प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी योगदान देत ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने कार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा,राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा.तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारा असल्याचेही आ.भोंगळे यांनी सांगितले.राष्ट्रध्वजाचा सन्मान,देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करण्यात आला.तिरंगा बाईक रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा गडचांदूरकरांच्या राष्ट्रभक्तीची प्रचिती देणारा ठरला,हे मात्र विशेष.
#Gadchandur Tiranga Bike Rally. #Independence Day 2026. #15 August 2026-- India’s 80th Independence Day. #Gadchandur City BJP.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
