Service Medals : चंद्रपूर पोलिस दलातील 'या' अधिकारी, कर्मचाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सेवा पदकाने गौरव|Marathi News.

News@Service Medals....

       Chandrapur : राज्य पोलीस दलात अखंडपणे,निष्ठेने आणि विशेष कौशल्याने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालय,भारत सरकार यांच्याकडून दरवर्षी मानाची सेवा पदके प्रदान करण्यात येतात.त्यानुसार सन 2026 साठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील 4 अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानाच्या सेवा पदकांसाठी निवड झाली आहे.

पोलीस सेवेत 15 वर्षे उल्लेखनीय सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’, तर 25 वर्षे अखंड व विशेष सेवा पूर्ण करणाऱ्यांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येते.

पदकप्राप्त अधिकारी व कर्मचारी :

१. सत्यजित शशिकांत आमले — पोलीस उपअधीक्षक.

सध्याची नेमणूक : उपविभागीय पोलीस अधिकारी,मूल उपविभाग

प्राप्त पदक : अतिउत्कृष्ट सेवा पदक.

२. दिनेश त्र्यंबक लबडे — पोलीस निरीक्षक.

सध्याची नेमणूक : पोलीस स्टेशन,चिमूर.

प्राप्त पदक : उत्कृष्ट सेवा पदक.

३. प्रविण रामचंद्र खरतड — पोलीस उपनिरीक्षक (अभियांत्रिकी).

सध्याची नेमणूक : बिनतारी संदेश विभाग,जि.चंद्रपूर.

प्राप्त पदक : अतिउत्कृष्ट सेवा पदक.

४. गुलाब रामचंद्र बलकी — ग्रेड पोलीस उपनिरीक्षक/1763.

सध्याची नेमणूक : पोलीस स्टेशन,पाथरी,जि.चंद्रपूर.

प्राप्त पदक : उत्कृष्ट सेवा पदक.

       पोलीस सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट,उल्लेखनीय आणि प्रदीर्घ कामगिरीची दखल घेत या चारही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मानाच्या सेवा पदकाने गौरव करण्यात आला आहे.त्यांच्या या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ अधिकारी व अंमलदारांनी पदकप्राप्त पोलीस बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून,त्यांच्या पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

#Service Medals #Chandrapur Police.

                   

                  ¢¢¢¢ ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢