Gadchandur:भारताच्या फाळणीदरम्यान झालेल्या हिंसाचारात प्राण गमावलेल्या तसेच विस्थापित झालेल्या लाखो नागरिकांच्या वेदनादायी आठवणींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ पाळला जातो.या दिनानिमित्त फाळणीच्या काळातील दुःखद घटना,संघर्ष आणि विस्थापनाच्या आठवणींचे स्मरण करून सामाजिक एकता, सलोखा आणि बंधुभावाचा संदेश दिला जातो.यानिमित्त कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
भाजपा तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार आणि भाजपा शहराध्यक्ष अरविंद(अरूण)डोहे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे संयोजक विक्की उरकुडे,हितेश चव्हाण व रमेश चुदरी यांच्या नेतृत्वात या मूक मोर्चाची सुरुवात संविधान चौकातून करण्यात आली.शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा मार्गक्रमण करत माता मंदिर परिसरात पोहोचला.तेथे मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे उपस्थित होते.त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विभाजनाच्या कटू इतिहासातून सामाजिक ऐक्याचा संदेश घेण्याचे आवाहन केले.
फाळणीतील प्रत्यक्षदर्शींचा सन्मान :
फाळणीदरम्यान सिंध प्रांतात वास्तव्यास असलेले हरीश्चंद्रजी अरोरा,विश्वंभरजी झाम तसेच हंसराज चौधरी,माजी सैनिक हरिदास येडमे यांचा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सन १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार झाला.असंख्य नागरिकांना आपली घरे,गावे आणि मातृभूमी सोडून विस्थापित व्हावे लागले.अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली,तर असंख्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.फाळणीचा हा काळ भारतीय इतिहासातील अत्यंत वेदनादायी पर्व असल्याचे मत सत्कारमूर्तींनी व्यक्त केले.
फाळणीच्या काळात सर्वस्व गमावलेल्या नागरिकांच्या संघर्षाचे स्मरण करणे,त्यांच्या त्यागाला आदरांजली वाहणे आणि भविष्यात अशा प्रकारच्या दुःखद घटना घडू नयेत यासाठी समाजात ऐक्य व परस्पर सौहार्दाची भावना अधिक दृढ करणे,हा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’मागील प्रमुख उद्देश आहे.
इतिहासातून धडा घेण्याचे आवाहन :
‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ हा केवळ भूतकाळातील घटनांचे स्मरण करण्याचा दिवस नसून,इतिहासातून धडा घेत सामाजिक एकता,शांतता आणि बंधुभाव अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे,असे मत आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी व्यक्त केले.
या मूक मोर्चा व कार्यक्रमाला भाजपच्या विविध आघाड्यांचे महिला व पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते,नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Partition Horrors Remembrance Day. #Silent March in Gadchandur City.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
