Chandrapur Crime : वरोऱ्यात LCBची मोठी कारवाई; पिस्टलसह 10 जिवंत काडतूसे जप्त|Marathi News.

News@Crime....

                Chandrapur नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB)पथकाने वरोरा शहरात मोठी कारवाई केली. सत्यम टॉकीजच्या मागील वडार वस्ती परिसरात एका इसमाच्या घरातून अवैधरित्या बाळगलेले पिस्टल,2 मॅग्झीन आणि 10 जिवंत काडतूसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.या कारवाईत एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपंचमी सणाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग तसेच अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी वरोरा डिव्हिजनमध्ये रवाना झाले होते.पोलीस स्टेशन वरोरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सत्यम टॉकीजच्या मागे,वडार वस्ती,वरोरा येथे राहणारा 'संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने'(वय 46 वर्षे),हा गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असून,त्याने आपल्या राहत्या घरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून ठेवले आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे LCB पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन घराची झडती घेतली.यावेळी घरातून 1 पिस्टल,2 मॅग्झीन आणि 10 जिवंत काडतूसे अवैधरित्या बाळगल्याचे आढळून आले.पोलिसांनी सदर अग्निशस्त्र,काडतूसे तसेच आरोपीचा मोबाईल असा एकूण ₹ 85,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

     याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक 902/2026,कलम 3,25भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपीला पुढील कारवाईस वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली,LCBचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

सदर कारवाईत सपोनि.दिपक कांक्रेडवार,पोउपनि.सर्वेश बेलसरे, पोउपनि.सुनील गौरकार,पोहवा.नितीन कुरेकर,सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले,रजनीकांता पुठ्ठावार,जय सिंह,प्रमोद कोटनाके, अमोल सावे,पोशि.विठ्ठल काकडे,प्रफुल पुप्पलवार,प्रतिक हेमके, अजित शेंडे,सुमित बरडे,चापोहवा.दिनेश अराडे,मिलींद टेकाम आणि गजानन मडावी यांनी सहभाग घेतला.

#Chandrapur District Crime News.

                             ¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢€€€€€€