Gadchandur:कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर,गडचांदूर येथे 15 ऑगस्ट 2026 रोजी 80वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.शहर भाजपच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात व्यापारी असोसिएशनचे सचिव 'प्रशांत गौरशेट्टीवार' यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गडचांदूर भाजपच्या विविध आघाड्यांतील महिला-पुरुष पदाधिकारी,भाजपचे नगरसेवक,ज्येष्ठ व युवा नेते,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला.
याचप्रमाणे शहरातील नगर परिषद,पोलीस स्टेशन,विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये,शाळा,महाविद्यालयातही आदरपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरभर विविध ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा निनाद ऐकू येत होता.नागरिकांच्या हातात डौलाने फडकणारे तिरंगे झेंडे आणि देशभक्तीच्या उत्स्फूर्त वातावरणामुळे संपूर्ण गडचांदूर शहर अक्षरशः ‘तिरंगामय’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
एकूणच,देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासत गडचांदूर शहरात 80वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात,जल्लोषात आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला.
#15 August 2026 — India’s 80th Independence Day. #Gadchandur City BJP.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
