Chandrapur : मूल उपविभागातील सावली आणि मूल पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली.२८ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्वतंत्र नाकाबंदी करून कत्तलीच्या उद्देशाने तसेच अत्यंत क्रूरतेने विना परवाना वाहतूक केली जात असलेली एकूण ४५ गोवंशीय जनावरे आणि १५ बोलेरो पिकअप वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण ७४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,१५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सावली पोलिसांची कारवाई;२१ गोवंशीय जनावरांची सुटका :
सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३४ ते ८ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोर गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली.यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता ७ बोलेरो पिकअप वाहनांमध्ये २१ गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी सातही वाहने आणि २१ गोवंशीय जनावरे असा ३७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.जप्त जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्यार फाउंडेशन गोशाळा,चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी सावली पोलीस ठाण्यात अप.क्र.०२६९/२०२६ अन्वये कलम २८१ BNS,प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० मधील कलम ११,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सात चालक/मालक ताब्यात :
१) सुर्यभान सोमा पाटेवार (वय २०),रा.घनोटी,पोंभुर्णा
२) प्रफुल परशुराम घोडमारे (वय ३५),रा.बोरमाळा,सावली.
३) नरेश लुमाजी कुकुडकार (वय ३६),रा.मौशी खांब,आरमोरी.
४) आकाश शंकर पोहरकर (वय ३०),रा.बोदली,गडचिरोली.
५) अविनाश ईश्वर दाने (वय २९),रा.आंबेटोला,गडचिरोली.
६) रोशन कविंद्र गोपशेट्टीवार (वय ३५),रा.अंतरगाव,सावली.
७) मिलेश दिवाकर वासेकर(वय २८),रा.बोदली,गडचिरोली.
मूल पोलिसांची कारवाई; २४ जनावरांसह ८ पिकअप जप्त :
मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतही २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११.३० वाजताच्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मौजा बेंबाळ चौकीसमोर नाकाबंदी करण्यात आली.यावेळी पोलिसांनी ८ बोलेरो पिकअप वाहनांमध्ये क्रूरतेने बांधून वाहतूक केली जात असलेली २४ गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली.
या कारवाईत ८ पिकअप वाहनांची अंदाजे किंमत ३२ लाख रुपये असून,जनावरांची किंमत ५ लाख ५५ हजार रुपये आहे.त्यामुळे एकूण ३७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आठ चालक मूल पोलिसांच्या ताब्यात :
१) महेश देवीदास फटींग (वय ३७),रा.कुर्झा,ब्रह्मपुरी.
२) किशोर सेवक नागपुरे (वय ३८),रा.बोंडेगाव,ब्रह्मपुरी.
३) विक्की धनपाल देशमुख(वय २८),रा. वेडवा,पवनी.
४) अंकुश देवराव मेंठुले (वय ४८),रा.पवनी,भंडारा.
५) दिपक यादव चुदरी (वय ४२),रा.व्याहाड खुर्द,सावली.
६) दिपक योगराज कांबळे(वय २५),रा.किटाळी,लाखनी.
७) दिगांबर मंगरू मुनघाटे (वय ३६),रा.आंबेशिवनी,गडचिरोली.
८) राहुल मोरेश्वर चौधरी (वय ३६),रा.चकपिरंजी,सावली.
१५ पिकअप,४५ जनावरे ७४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त :
सावली आणि मूल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १५ पिकअप वाहने,४५ गोवंशीय जनावरे असा एकूण ७४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत एकूण १५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई :
जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO)सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
सावलीचे पोलीस निरीक्षक पुल्लरवार,मूलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड,सपोनि.सुरेश कन्नाके,पोउपनि.रुपेश कुंभरे, पोउपनि.उमेश पिपरे,पोउपनि.व्यंकटेश डोनोडे,सावली पोलीस ठाण्याचे सपोनि.सचिन मुसळे,पोउपनि.जितेंद्र तिजारे,पोउपनि. नितीन देऊळकर,सफौ.यशवंत कोसमशिले तसेच दोन्ही पोलीस ठाण्यांतील पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
#Chandrapur police. #Crime News. #Cattle smuggling. #Chandrapur District Crime News.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
