Chandrapur : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांविरुद्ध पोलीसांतर्फे मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहे.जिल्ह्यातील अवैध रेती उपसा व गौण खनिजाची होणारी चोरटी वाहतूकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र सतर्क झाली आहे.याच श्रेणीत 28 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा(LCB)च्या पथकाने बल्लापूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त केला आहे.या कारवाईत तब्बल 45 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली तर दुसरा फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार,28 मे रोजी स्थानिक LCB च्या पथकाला माहिती मिळाली की,बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतून गौण खनिज(रेती)ची अवैधरित्या चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे.या माहितीवरून LCB च्या पथकाने तात्काळ बल्लारपूर परिसरात दबा धरून छापा टाकला.यामध्यै रेतीची बेकायदेशीर वाहतूक करताना पकडण्यात आला.या कारवाई दरम्यान पोलिसांनी हायवा ट्रक क्रमांक MH/34/CQ/1190,ताब्यात घेऊन त्यामध्ये बेदायदेशीरपणे भरलेली सुमारे 9 ब्रास रेती आढळून आली.पोलिसांनी या कारवाईत एक हायवा ट्रक कि.अं. 45 लाख आणि 90 हजार रुपये किमतीची 9 ब्रास रेती,असा एकूण 45 लाख,90 हजारांचा मुद्देमाल जप्त करून केला ट्रक चालक गणेश शिवाजी कोरपल्लेवार वयवर्ष 25 रा.नारपठार तालुका जिवती,याला ताब्यात घेतले तर या धंद्यातील मुख्य सूत्रधार आणि गाडी मालक गोपीनाथ राठोड रा.सारंगापूर तालुका जिवती,हा फरार असून पोलीस शोध घेत आहेत.या दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.LCB crackdown on sand mafia; 45 lakhs worth of khaiva seized,driver arrested.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात LCB च्या पथकाने केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईने जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले असून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाची ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील,असा इशारा देण्यात आला आहे.
#Chandrapur District Crime News.#Sand Smuggling News.#LCB crackdown on sand mafia; 45 lakhs worth of khaiva seized,driver arrested.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
